जून महिना भरभराटीचा पाच राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा

१ जून रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रहाने आणि देवगुरु बृहस्पति यांनी (planetary) या राशीत प्रवेश केला, त्यानंतर यूरेनस ग्रहानेदेखील वृषभ राशीत प्रवेश केला.ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या युतीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, ज्याचा प्रभाव १२ राशींच्या लोकांवर पाहायला मिळतो. वृषभ राशीत अनेक ग्रहांची युती निर्माण झाली आहे. ज्यात आधीपासूनच चंद्र, बुध आणि सूर्य ग्रह विराजमान होते. १ जून रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रहाने आणि देवगुरु बृहस्पति यांनी या राशीत प्रवेश केला, त्यानंतर यूरेनस ग्रहानेदेखील वृषभ राशीत प्रवेश केला. या पाच ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव १२ राशींतील काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी या पाच ग्रहांचे राशीपरिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल

वृषभ

पाच ग्रहांच्या वृषभ राशीतील संयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. (planetary)समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींनादेखील या पाच ग्रहांचा वृषभ राशीतील संयोग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.

सिंह

वृषभ राशीतील ग्रहांच्या संयोगाने या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच (planetary)स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील या पाच ग्रहांचा वृषभ राशीतील संयोग खूप खास ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

हेही वाचा :

आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’

 राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर

विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा