भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, (content)भारत सरकारने देशातील सर्व OTT प्लॅटफॉर्म्सना पाकिस्तानी कंटेंट जसे की वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट इत्यादी तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या निर्णयाचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षेची खात्री करणे आणि देशविरोधी प्रचाराला आळा घालणे हा आहे.या निर्णयाचा मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानी OTT प्लॅटफॉर्म Vidly TV वर प्रदर्शित झालेली ‘Sevak: The Confessions’ ही वेब सिरीज. या सिरीजमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारी, देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आणि सामाजिक सलोखा भंग करणारी असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे. (content)या सिरीजमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार, बाबरी मशीद पाडणे, मालेगाव स्फोट, समझौता एक्सप्रेस स्फोट यांसारख्या संवेदनशील घटनांचे विकृत चित्रण करण्यात आले आहे .

‘Sevak: The Confessions’ या वेब सिरीजचा पहिला एपिसोड 26 नोव्हेंबर 2022 रोजी, म्हणजेच 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. या सिरीजमध्ये भारतीय ध्वजाच्या अशोक चक्राला जळताना दाखवले गेले आहे, तसेच सिख समुदायात असंतोष आणि विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे (content).या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने IT नियम 2021 अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून Vidly TV च्या वेबसाइट, दोन मोबाइल अॅप्स, चार सोशल मीडिया अकाउंट्स आणि एक स्मार्ट टीव्ही अॅपला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे देशातील OTT प्लॅटफॉर्म्सवर पाकिस्तानी कंटेंटचा प्रसार थांबवला जाणार आहे.
हेही वाचा :
भारत-पाकिस्तान तणावामुळे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय!
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत
घटस्फोटानंतर समांथाच्या आयुष्यात नवी चाहूल? विवाहित दिग्दर्शकाशी जडले प्रेमसंबंध?