Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ

Elon Musk ची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक लवकरच भारतात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. डेटा लोकॅलायझेशन आणि सिक्योरिटी रिक्वायरमेंट्सच्या कराराबद्दल स्टारलिंक आणि दूरसंचार विभाग यांच्यात दीर्घकाळापासून मतभेद होते. मात्र, आता रिपोर्टनुसार स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यानंतर सॅटेलाइट (satellite) ब्रॉडबँड सेवेने लाइसेंस अ‍ॅप्लिकेशनवर पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात Elon Musk च्या स्टारलिंकच्या प्रवेशाचा मार्ग अतिशय सोपा झाला आहे. देशात स्टारलिंकचा सॅटेलाइट(satellite) ब्रॉडबँड सेवेने लाइसेंस ऐप्लिकेशनवर पुढे जाणे जवळपास निश्चित आहे. स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या (DoT) “डेटा लोकलायझेशन आणि सिक्योरिटी रिक्वायरमेंट्सच्या” कराराचे पालन केले आहे. दोघांनी सुरक्षेशी संबंधित अनेक गोष्टींवर एकमत केले आहे. हे प्रकरण काही दिवस संमतीवर अडकले होते.

स्टारलिंक आणि जेफ बेझोस यांच्या क्विपरच्या भारतातील प्रवेशासाठी दूरसंचार विभागाच्या कराराचे पालन करणं ही मोठी गोष्ट होती, जी आता स्टारलिंकने स्वीकारली आहे. दूरसंचार विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, जी कोणती सॅटेलाईट कंपनी भारतात काम करेल, त्याला फक्त देशातच डेटा स्टोर करावा लागेल. या सर्व प्रकरणातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारत सरकारने स्टारलिंकसाठी मार्ग खुला केला असला तरी, स्टारलिंकने अद्याप यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या सर्व अटी मान्य केल्या असल्या तरी अद्याप याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

स्टारलिंकने स्पेस रेग्युलेटर इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) कडे देखील अर्ज केला होता. हा अर्ज देखील लवकरच स्वीकारला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. अहवालात म्हटले आहे की स्टारलिंक सेवा या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. कारण ट्रायने किंमत आणि स्पेक्ट्रम वाटपाचे नियम स्थापित केल्यानंतरच सेवा सुरू होतील. डिसेंबरपर्यंत ट्राय किंमत आणि स्पेक्ट्रम वाटपाचे नियम ठरवेल अशी अपेक्षा आहे.

Jio, Airtel आणि Vodafone Idea ने स्टारलिंक भारतात येण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलकॉम कंपन्या लिलावाद्वारे स्पेक्ट्रम वाटपासाठी आग्रही आहेत. स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या आणि टेलिकॉम टॉवर्ससारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या लेगसी ऑपरेटरना लिलावाने समान संधी दिले पाहिजे असे त्यांचे मत आहे. मात्र, स्टारलिंकचे म्हणणे आहे की, तिची सेवा टेलिकॉम कंपन्यांपेक्षा वेगळी आहे.

अलीकडेच, दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की सॅटेलाइट ब्रॉडबँडसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल आणि लिलाव केले जाणार नाही. या विधानानंतर एअरटेल आणि जिओसाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर स्टारलिंकसाठी मार्ग सोपा झाला आहे.

हेही वाचा :

हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?

शुटिंग दरम्यान, सेटवरच बाटलीत लघवी करायचा अभिनेता

“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप