अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची हत्या; भायखळ्यात नेमकं घडलंय काय?

मुंबई: राज्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. राज्यात(political) एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना, कोयता गँगची दहशत, हत्या, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. धक्कादायक म्हणजे यात सर्वसामान्य माणूस नव्हे तर राजकीय लोकप्रतिनीधीही अशा घटनांना बळी पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

अजित पवार गटाचे (political) भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारधार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. सचिन यांच्या घराजवळ भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

एका माहितीनुसार, सचिन कुर्मी हे मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांच्या जवळचे व्यक्ती होते. या घटनेनंतर समीर भुजबळ कुर्मी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कुर्मी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सचिन कुर्मी यांच्यावर हल्ला कोणत्या कारणासाठी केला गेला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण अंतर्गत गटबाजीतून किंवा वादातून त्यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण या घटनेनंतर सचिन कुर्मी यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांच्या समर्थांकडून करण्यात येत आहे. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

हेही वाचा :

माजी क्रिकेटपटूच्या आईची आत्महत्या? गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

‘दो पत्ती’ चित्रपटात शाहीर शेख करणार अभिनेत्री क्रिती सेनॉनसह रोमान्स!