कोल्हापूर; साखर उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन, उत्तर प्रदेशालाही टाकले मागे

उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने साखर उत्पादनात यावेळी अव्वल स्थान मिळवले (production)आहे. राज्यात यंदाच्या हंगामात ११० लाख मे.टन इतके उत्पादन झाले आहे.यंदाचा हंगाम संपताना आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ११० लाख मे. टन साखर उत्पादन घेत महाराष्ट्र देशात नंबर वनचा मानकरी ठरला. पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात साखरेची मोठे उत्पादन झाले आहे. अवकाळी, अवेळी पाऊस आणि उसाच्या कमी लागवडीमुळे राज्यात साखर उत्पादन घटेल हा अंदाज खोटा ठरला आहे.
दोन वर्षापूर्वी राज्यात उच्चांकी १२७ लाख टनाचे साखर उत्पादन झाले होते. गेल्या हंगामात ते १०५ लाख टनापर्यंत खाली घसरले. या पार्श्वभूमीवर यंदा ते उत्पादन केवळ ८८ लाख टनापर्यंत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कारण अवेळी आणि अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिन्हे होती. पण, नोव्हेंबरमध्ये झालेला पाऊस, (production)दरवर्षीप्रमाणे शेवटपर्यंत सुरू राहिलेला हंगाम आणि इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध यामुळे साखरेचे उत्पादन वाढले आहे.

गेल्या काही वर्षात साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात स्पर्धा असते. यंदा महाराष्ट्राने ही स्पर्धा जिंकत नंबर वनचा मान पटकावला आहे. देशातील सुमारे 534 साखर कारखान्यांचा हंगाम नुकताच संपला. त्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ११० लाख तर उत्तर प्रदेशात 104 लाख टन तर कर्नाटकात 54 लाख टन एवढे उत्पादन झाले आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या ८५ टक्के साखर या तीन राज्यातच होते. (production)देशात यंदा ३१२९ लाख टन उसाचे गाळप होऊन 321 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले.
तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, बिहार,आंध्रप्रदेश, हरियाणा, तेलंगणा यासह विविध राज्यात साखर कारखाने आहेत. त्यांची संख्या कमी असून उत्पादनही ५ ते 10 लाख टनापर्यंत आहे आहे.
विविध राज्यातील साखर उत्पादन
राज्य | कारखाने | उत्पादन |
महाराष्ट्र | २०७ | ११० ला.टन |
उत्तर प्रदेश | १२१ | १०३ ला. टन |
कर्नाटक | ७६ | ५२.६० ला. टन |
तामिळनाडू | ३० | १४.७५ ला. टन |
गुजरात | १७ | ९.२० ला. टन |
हेही वाचा :
सांगली येथील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी!
मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट
उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट