कोल्हापुरातील साखर सम्राट, विधानसभेची तयारी जोरदार, पक्ष कुठला तारणार?
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभेत (sugar)यंदा वारे फिरणार असल्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे.. कारणही तसंच आहे. साखर सम्राट मानसिंग खोराटे आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हालेवाडी गावचे(sugar) सुपुत्र. इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण गोव्याला. केमिकल इंजिनिअरिंग पदवीधारक. काही काळ घोडावत ग्रुपमध्ये नोकरी. सध्या अथर्व शुगर कंपनीचे अध्यक्ष. जिल्ह्यात साखर निर्यातीचा मोठा व्यवसाय. दौलत आणि इतर एक कारखान्याची मालकी. मुंबईत वडील गिरणी कामगार होते.
सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड असलेले खोराटे आता नवीन इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहेत. बंद असलेला दौलत कारखाना स्वतःच्या जीवावर त्यांनी सुरळीत चालवून दाखवत चंदगड विधानसभेत नागरिकांना रोजगार मिळवून दिला. तरुणांच्या रोजगार निर्मितीचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी चंदगड विधानसभेत एक प्रकारे बदल घडवून आणला. त्यातून त्यांना लोकप्रियता लाभली. विशेषतः तरुणांमध्ये फार लोकप्रिय आहेत.
सध्या राजेश पाटील चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राजेश पाटील अजित पवार समर्थक आमदार आहेत.. २०१९ च्या निवडणुकीत शिवाजी पाटील यांनी ५१ हजार १७३ मतं, तर विनायक उर्फ विरगोंदा पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत ४३ हजार ९७३ मतं घेत लढत तिरंगी ठेवलेली होती. नंदिनी बाभुळकर पण २०२४ ची आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या शर्यतीत असल्याचं समजतंय.. सध्या तरी मानसिंग खोराटे अपक्ष लढण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहेत.
काल मुंबईतील डिलाईल रोड (एन एम जोशी मार्ग) परिसरात वसलेल्या कोल्हापूरकर समर्थकांसोबत ‘मन की बात’ करत मानसिंग खोराटे आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून प्रचाराचा नारळ फोडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला सध्या चार धक्के बसले आहेत, तर पाचवा धक्का लवकरच बसण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीलाही कोल्हापुरात दुसरा झटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
हेही वाचा:
विधानसभा तोंडावर असतानाच अजित पवारांच्या अडचणीत वाढ!
ना बिचुकले ना राखी…बिग बॉसच्या घरात होणार ‘या’ व्यक्तीची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?
‘धोनीने आरशात चेहरा पाहावा, मी त्याला…’; युवराज सिंगचे वडील संतापले
एअरपोर्टवर अचानक एका मुलीने बॅग खाण्यास केली सुरूवात…Video
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ; ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट