Kolhapur : लैंगिक अत्याचारप्रकरणी पर्यवेक्षकाला अटक; कोल्हापूर रेल्वेस्थानकावर घटना

येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनल्स येथे महिलेवर लैंगिक (railway)अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने संशयित पर्यवेक्षक गणेश दिलीप हंकारे वय ३०, कोल्हापूर याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानक परिसरात स्‍वच्‍छतेचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते. १३ एप्रिलला सकाळी दहाच्या सुमारास रेल्वेस्थानकातील व्हीआयपी खोलीतील स्वच्छता (railway)करून घेण्यासाठी पर्यवेक्षक गणेश हंकारेने पीडित महिलेला सांगितले. त्यानुसार महिला तेथे स्वच्छता करण्यासाठी गेल्यानंतर गणेशने दरवाजाला आतून कडी लावली. पीडित महिलेने जाब विचारला, तेेव्हा ‘आरडाओरडा करायचा नाही’ अशी दमबाजी केली. कोणाला काही सांगायचे नाही, असे सुनावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने त्याची माहिती नातेवाइकांना दिली.

सोमवारी ता.५ दुपारी नातेवाइकांनी रेल्वे पोलिसांत संशयित हंकारे याला जाऊन जाब विचारला. तेथे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मिरज येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे (railway). हंकारे याला आज अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला पाच पोलिस कोठडी देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक आर. डी. गोरड अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…Video Viral

महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा

त्यांनी कुंकू पुसण्याचा पाप केलं…; ऑपरेशन सिंदूरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

IPL 2025 दरम्यान विमानतळावर ९ किलो ड्रग्जची तस्करी, मुद्देमालासह ‘हा’ क्रिकेटपटू पोलिसांच्या ताब्यात..