कोल्हापूर विनयभंगप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी घरात बोलावून मुलीशी अश्‍‍लील चाळे

दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीला छायांकित प्रत(studying) देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्याशी अश्‍‍लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला विनयभंगप्रकरणी दोषी ठरविले. महेश नारायण नाजरे वय ५८ असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी या शिक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड ठोठावला.

आरोपी शिक्षक महेश नाजरे येथे राहण्यास आले. त्याच्या ओळखीतील दहावीत शिकणारी मुलगी इतिहासाच्या पुस्तकाची छायांकित प्रत देण्यासाठी नाजरेच्या घरी गेली होती.(studying) यावेळी नाजरेच्या घरी कोणीच नव्हते. आरोपी नाजरे मोबाईलवर अश्‍‍लील व्‍हिडिओ पाहत बसलेला होता. त्याने या अल्पवयीन मुलीला घरात बोलावून अश्‍‍लील चाळे करीत खोलीत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने हात सोडवून पळ काढला होता. या मुलीने घरी जाऊन तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला.

मुलीच्या घरच्यांनी याबाबत नाजरेला विचारणा केली असता ‘माझी चूक झाली माफ करा, पुन्हा असे होणार नाही’ अशी विनवणी केली; परंतु, तिच्या पालकांनी करवीर पोलिस ठाण्यात (studying)जाऊन तक्रार दिली. शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी होऊन सरकारी वकील ॲड. मंजूषा पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले.

हेही वाचा :

बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…

अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’

हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक

केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ