महिलांनो तुमच्या सुरक्षेसाठी फोनमध्ये ‘हे’ Apps लगेच डाउनलोड करा
कोलकाता डॉक्टर रेप आणि मर्डर प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या(ladies) सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. कोलकातानंतरही देशभरात अनेक धक्कादायक घटना उघड झाल्या. महाराष्ट्रातही अनेक खळबळजनक प्रकरणे समोर आली. देशात अशा बऱ्याच महिला आहेत, ज्या रात्री उशिरापर्यंत काम करतात किंवा त्या नाइट शिफ्ट करतात. अशावेळी महिलांना रात्रीच्या वेळी सुरक्षेबाबत धाकधूकच लागलेली असते.
मग, महिलांनो(ladies) घाबरण्याचे कारण नाही. कारण, प्रत्येकवेळी तुमच्यासोबत कुणी असेलच असं नाही. यासाठी तुमच्या फोनमध्ये काही ॲप लगेच डाउनलोड करून ठेवा. हेच ॲप कठीण प्रसंगी तुम्हाला उपयोगी पडतील. आता हे ॲप नेमके कोणते, त्याबाबत जाणून घेऊयात.
रक्षा ॲप : या ॲपद्वारे महिला एक बटन दाबून आपण संकटात असल्याचा मेसेज आपल्या कुटुंबाला पाठवू शकते. हे ॲप वापरकर्त्याच्या कुटुंबाला संकटाच्या वेळी त्याच्या वर्तमान लोकेशनसह अलर्ट पाठवते. या ॲपची रचनाच अशी करण्यात आली आहे, ज्यात वापरकर्त्याचा फोन बंद किंवा नॉन-ऑपरेटिव्ह मोडमध्ये असला तरीही, वापरकर्ता व्हॉल्युम कि फक्त तीन सेकंद दाबून आपल्या जवळच्या लोकांना अलर्ट करू शकतो. यासोबतच रक्षा ॲपमध्ये एसओएस फंक्शन आहे, ज्यामुळे डेटा किंवा इंटरनेट नसल्यास तिथून एसएमएसही पाठवता येतात.
सेफ्टीपिन ॲप : हा ॲप वैयक्तिक सुरक्षा सुनिश्चित करते. जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, सुरक्षित ठिकाणांचे लोकेशन या वैशिष्ट्यांमुळे ते इतर ॲप्सपेक्षा चांगले समजले जाते. इंग्रजीशिवाय हे ॲप हिंदी आणि स्पॅनिश भाषांमध्येही आहे.
वुमन सेफ्टी ॲप : हे ॲप फक्त एका बटणाच्या टॅपने अडचणीत असलेल्या वापरकर्त्याला त्या ठिकाणाची आणि परिस्थितीशी संबंधित माहिती शेअर करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे ॲप गुगल मॅपच्या लिंकसह पूर्व-निर्धारित क्रमांकावर वापरकर्त्याचे सर्व तपशील पाठविण्याची सुविधादेखील प्रदान करते. मोबाईल फोनच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यांचा वापर करून एकाच वेळी दोन फोटो क्लिक करून ते थेट सर्व्हरवर अपलोड करण्यासाठी या ॲपची रचना करण्यात आलीये.
स्मार्ट 24×7 ॲप : हे ॲप महिला वापरकर्त्यांसाठी उत्कृष्ट मानले जाते. हे ॲप भारतातील विविध राज्यांच्या पोलिस विभागांद्वारे चालवले जात आहे. महिलांना काही अडचण आल्यास या ॲपद्वारे पॅनीक अलर्ट पाठवला जातो. तसेच, हे ॲप वापरकर्त्याला पोलिसांसोबत आवाज आणि फोटो शेअर करण्याची सुविधा देखील प्रदान करते.
हेही वाचा:
10 ग्रॅम सोन्यासाठी आता मोजा फक्त ‘इतके’ रुपये
ब्रेकअपनंतर 5 महिन्यात आदित्य आणि अनन्या पुन्हा एकत्र?
अजितदादांसोबतची युती म्हणजे ‘असंगाशी संग’; शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनंही सुनावलं