आधीचीला सोडलं… पृथ्वी शॉच्या नव्या गर्लफ्रेंडला पाहिलं का? कॅमेऱ्यात…

पृथ्वी शॉने त्याची जुनी गर्लफ्रेंड निधी तपाडियाला (previous)धोका दिलाय का? पृथ्वी शॉला आता नवीन गर्लफ्रेंड मिळालीय का? नाही असं उत्तर असेल तर मग ती तरुणी कोण आहे? पृथ्वी शॉसोबत कारमध्ये बसलेली तरुणी कॅमेऱ्यासमोर तोंड का लपवत होती? गर्लफ्रेंड नाही तर डर कशाला? हे सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील. पृथ्वी शॉचा हा लेटेस्ट व्हिडीओ पाहिल्यानंतर तर तुमच्या मनात नक्कीच या प्रश्नांनी वादळ केलेलं असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही निधी तपाडियाची इन्स्टा स्टोरी पाहू शकता. या स्टोरीतून निधीच्या काळजाचे कसे तुकडे तुकडे झालेत हे दिसून येईल.

निधी तपाडिया ही अभिनेत्री आहे. मॉडल आहे. आतापर्यंत आलेल्या बातम्यानुसार, पृथ्वी शॉ हा निधीला डेट करत असल्याची चर्चा होती. दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं जात होतं. पण नव्या तरुणीसोबतचा पृथ्वी शॉचा फोटो समोर आलाय. त्यामुळेच निधीच्या काळजाचं पाणी पाणी झालंय. तिच्या पोस्टमधून तिने वेदनेला वाट मोकळी करून दिलीय. निधी अत्यंत दु:खी झाली आहे.

निधीची पोस्ट वाचल्यानंतर तुम्हालाही वाईट वाटेल. निधी म्हणते, आधी त्याच्या वाईट काळात त्याला साथ द्या, नंतर त्याला धोका देताना पाहा… निधीची ही पोस्ट सर्व काही सांगू जाते. हे सांगतानाच पृथ्वी शॉचा स्वभावही तिने अधोरेखित केला आहे. पृथ्वीला जाणीव नसल्याचंही तिच्या पोस्टमधून अधोरेखित होतं. (previous)तसेच पडत्या काळात आपण त्याला किती सपोर्ट केला होता, हे सुद्धा निधीने म्हटलं आहे.

पृथ्वीने निधीला धोका दिलाय की हे प्रकरण वेगळंच काही आहे? सध्या तरी यावर थेट भाष्य करणं घाईचं होईल. आम्हीही याचा दावा करत नाही. पण पृथ्वी शॉचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यातील ती तरुणी कोण आहे? हा सवाल केला जात आहे. ही तरुणी पृथ्वीची कोणीच नाही तर मग ती तोंड का लपवतेय? काही तरी गडबड तर नाही ना? की हा व्हिडीओच त्याच्या दुसऱ्या रिलेशनशीपची पुष्टी तर करत नाही ना? असा सवाल (previous)करण्यासही वाव मिळत आहे.

पृथ्वी आणि या तरुणीचा आलेला व्हिडीओ आणि त्यानंतर निधीने केलेली पोस्ट यातून बरंच काही स्पष्ट होतंय. सध्या तरी पृथ्वी क्रिकेटच्या ट्रॅकवर परत येण्याची काही चिन्ह दिसत नाहीये. पृथ्वीचाही तसा काही फोकस दिसत नाहीये. तर दुसरीकडे नव्या आणि जुन्या गर्लफ्रेंडबाबतचा खुलासा लवकरच होईल, अशी आशा त्याचे चाहते बाळगत आहेत.

हेही वाचा :

बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…

अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’

हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक

केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ

IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट