महायुतीत ‘महाभिडंत’! शिंदे- अजित पवार गटात राडा…

पुण्यात महायुतीतील दोन गट भिडले आहेत. मोहल्ला कमिटी बैठकीत गोंधळ झालाय. धनकवडीत शिंदे- अजित पवार (political updates)गटाच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाली. मोहल्ला कमिटीच्या बैठकीत शिवसेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी भिडले आहेत.

महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत मोठा राडा झालाय. शिवसेना शिंदे गट विरोधात अजित पवार गट भिडले. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख उद्धव कांबळे यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळतेय. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार वादावादी झाली आहे.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (political updates)पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत राजकीय कुरघोडी आणि दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाल्याने हा चर्चेचा विषय बनल्याचे पाहायला मिळाले.

बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा सुरू होती, असे असताना पद्मावती परिसरातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केला की, सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात ते बंद करण्यात यावेत.

यामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी बोलण्यास मज्जाव केला. कांबळे यांना काही काळानंतर बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा ही जागा जगताप यांचीच होती, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केल्यावर हा वाद उफाळला. शाब्दिक चकमक उडाली. बैठकीमध्ये मोठा गोंधळ उडाला.

हेही वाचा :