अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे.(jaggery) या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस तुम्हाला खास बनवायचा असेल तर महाराष्ट्रीय पांरपारिक सांजोऱ्या पदार्थ बनवू शकता. खमंग खुसखुशीत गूळाच्या सांजोऱ्या बनवायला सोप्या असून चवदार देखील आहे. खमंग खुसखुशीत गूळाच्या सांजोऱ्या बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

गूळाच्या सांजोऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मैदा
गूळ
बारीक रवा
पाणी
तूप
तीळ
खसखस
खोबरा किस
गूळाच्या सांजोऱ्या बनवण्याची कृती
सर्वात आधी २ कप रवा गरम कढईत चांगले भाजा. नंतरएका भांड्यात काढा. परत कढईत २ कप गूळ आणि अर्धा ते पाऊण कप पाणी घालून चांगले मिसळा आणि सिरप तयार करा.(jaggery) हे सिरप भाजेल्या रव्यामध्ये मिसळा. आणि नंतर तूप घाला. चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा. नंतर हे सारण रात्रभर भिजत ठेवावे. यानंतर एका कढईत पाव कप तीळ ,नंतर १ चमचा खसखस आणि १ कप किसलेले खोबरे एक एक करून भाजावे आणि तयार रवा मिश्रणात मिसळा.
नंतर सर्वात शेवटी वरून वेलची पावडर मिसळावी. हे मिश्रण चांगले चमच्याने मिसळा. आता एका परातीमध्ये २ कप मैदा घ्या त्यात अर्धा कप बारीक रवा, पाव कप तूपाचे मोहन, मीठ घालून चांगले हाताने मिसळा.(jaggery) नंतर पाणी घालून पीठ मळून घ्यावे. १५ मिनिटं झाकून ठेवावे. नंतर या पीठाचा छोटा गोळा घेऊन लाटून घ्या आणि तयार मिश्रण त्यात भरा आणि वरून परत एक पोळी त्यावर ठेवा आणि जास्तीचा भाग कट करावा. नंतर तेलात सांजोऱ्या तळून घ्याव्या. गूळाच्या खुसखुशीत सांजोऱ्या तयारा आहेत. घरातील सर्वजण तुमचे कौतुक करतील.
हेही वाचा :
आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र? कोणाचा होणार पत्ता कट? जाणून घ्या
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स ऐवजी ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक्स प्या, तुमचे शरीर होईल थंड
स्कूल बस चालकाकडून ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; प्रायव्हेट पार्टमध्ये घातला पेन
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का BCCIने दिली माहिती
‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?