संध्याकाळच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट अंजीर चटणी

संध्याकाळच्या जेवणात नेहमीच भाजी काय बनवावं? असा प्रश्न महिलांना पडतो. नेहमीच आहारात कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही संध्याकाळच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी अंजीर चटणी(chutney) बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात ओले अंजीर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

अंजीर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये फायबर,विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के आणि विटामिन 6 इत्यादी घटक आढळून येतात. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह इत्यादी गुणधर्म आढळून येतात.

तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स शरीराचा मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात. काहींना ओले अंजीर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हा पदार्थ बनवू शकता. चपाती, भाकरीसोबत ही चटणी(chutney) अतिशय सुंदर लागते.

साहित्य:

  • ओले अंजीर
  • मीठ
  • पुदिन्याची पान
  • हिरव्या मिरच्या
  • लसूण
  • कढीपत्ता

कृती:

  • अंजीर चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओले अंजीर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात अंजीरचे तुकडे, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, लसूण आणि कढीपत्त्याची पाने टाकून बारीक वाटून घ्या.
  • नंतर त्यात मूठभर पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा बारीक वाटा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली अंजीरची चटणी. ही चटणी तुम्ही बाहेर फिरायला जाताना किंवा इतर वेळी घरात खाण्यासाठी बनवू शकता.

हेही वाचा :

उर्फी जावेदचा पोल डान्स करताना गेला तोल! Video पाहून चाहते थक्क

तुमच्या शरीरावरील ‘हे’ तीळ सांगतात, तुमचे लग्न लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज!

महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू तस्कराकडून शिवीगाळ अन् धक्काबुक्की; तीन जणांवर गुन्हा दाखल