सकाळी नाश्तात झटपट बनवा पौष्टिक ‘ज्वारीच्या पीठाचे अप्पे

तुम्हाला सकाळी नाश्त्यात पौष्टिक आणि चवदार पदार्थ खायचा (breakfast)असेल तर ज्वारीच्या पीठापासून अप्पे तयार करू शकता. हे अप्पे झटपट तयार होतात. तसेच बनवायला देखील सोपे आहे. ज्वारीमध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच यामुळे पोट दिवसभर भरलेले राहते आणि थकवा जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीच्या पीठाचे अप्पे कसे बनवायचे आणि साहित्य काय लागते.

ज्वारीच्या पीठाचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 कप ज्वारीच पीठ
1/2 कप रवा
1/2कप दही
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक (breakfastचिरलेला कांदा
हळद
धणेपुड
बारीक चिरलेली मिरची
1 चमचा इनो
तीळ

ज्वारीच्या पीठाचे अप्पे बनवण्याची कृती
ज्वारीच्या पीठाचे अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या. नंतर त्यात रवा , बारिक चिरलेली कोथिंबीर , बारीक(breakfast चिरलेला कांदा, हळद, धणे पावडर, लाल तिखट, मीठ आणि दही चांगले मिसळा. नंतर थोडे पाणी मिसळा आणि पीठ पतले करा. नंतर अप्पे पात्र गरम करा आणि थोडे तेल लावा. नंतर तयार मिश्रण त्यात घाला. थोडा वेळ झाकून ठेवा. तयार अप्पे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

हेही वाचा :

भारत-पाकिस्तान तणावामुळे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय!

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत

घटस्फोटानंतर समांथाच्या आयुष्यात नवी चाहूल? विवाहित दिग्दर्शकाशी जडले प्रेमसंबंध?