मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा आंदोलन

देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे(fasting). आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषण(fasting) सुरू करणार आहेत. ८ जून रोजी नारायण गडावर ते सभा देखील घेणार आहेत. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा एकदा ते उपोषण आणि आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या ४-५ लोकांमुळे आली असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

जरांगे पुढे म्हणाले, आम्ही भाजप विरोधी नाही. सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असंही त्यांनी म्हटलं आहे. जर सरकारने मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही असंही ते पुढे म्हणालेत.

हेही वाचा :

राजकारण पेटले महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

“दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही”; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत

निवडणुकीनंतर बसणार धक्का, 50 ते 250 रुपयांनी महागणार मोबाईल रिचार्ज !