महाराष्ट्रात मराठीच! भाषा वादात तामिळनाडू्च्या मुख्यमंत्र्यांची उडी

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तामिळनाडू राज्यातून सर्वाधिक विरोध होत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही हिंदी विरोधाचे स्वर तीव्र झाले आहेत. राज्यात मराठी भाषेलाच प्राधान्य राहील असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या वादात आता थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उडी घेतली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन करतंय का हे स्टॅलिन यांना जाणून घ्यायचं आहे.

स्टॅलिन म्हणाले, हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकावर प्रचंड टीका झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन राज्यात फक्त मराठी भाषाच अनिवार्य आहे असे म्हटले होते. गैर हिंदी भाषक राज्यांवर हिंदी लादण्यावर झालेल्या टीकेवरून त्यांची भीती या वक्तव्यातून दिसून येते, असे एमके स्टॅलिन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *