मॅच फिक्सिंग? काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर ‘कॅन्सल स्टॅम्प,’ कार्यकर्त्यांचा आक्षेप

शहरातील हिंदी सिटी हायस्कूलच्या मतदान(stamp collecting) केंद्रावर प्रदर्शित झालेल्या उमेदवारांच्या यादीत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कोणीतरी रद्दचा शिक्का लावल्याने मोठा गोंधळ झाला. ही बाब समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि मतदानाला सुरवात झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली.

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत(stamp collecting) भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. यासोबतच वंचितचे राजेश बेले, बसपचे राजेंद्र हरीशचंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टीचे अवचित सयाम, जय विदर्भ पार्टीचे अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पौर्णिमा घोनमोडे, अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत, सनमान राजकीय पक्षाचे विकास लसंते, भीमा सेनेचे विद्यासागर कासर्लावार, पीपल्स पार्टी अॅाफ इंडियाचे सेवकदास बरके, अपक्ष दिवाकर उराडे, मिलिंद दहीवले, संजय गावंडे हे उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यात चंद्रपूर लोकसभेचे पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिलला मतदान झाले. आज सकाळी शहरातील हिंदी सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या उमेदवाराच्या यादीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कॅन्सलचा शिक्का लावण्यात आला होता.

याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना झाली. त्यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी हे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा प्रशासन आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा :

‘इंडिया आघाडी’ स्वार्थासाठी एकत्र; काँग्रेस विकासाच्या वाटेतली भिंत.. नांदेडच्या सभेत PM मोदी कडाडले!

आर्थिक मंदीची चाहूल? देशातील आघाडीच्या टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये 63,759 कर्मचारी झाले कमी

“आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, पण…”, ठाकरेंचा मोठा दावा