1 मे तारीख भाग्याची! ‘या’ 3 राशींचे दिवस झटक्यात पालटणार

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षात बहुतेक लोकांचे भाग्य बदलणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातील अनेक मोठ-मोठ्या ग्रहांच्या(rashi) हालचाली, त्यांचे नक्षत्र बदल होणार आहेत.

मार्च-एप्रिल महिन्यात आधी शनिच्या संक्रमणामुळे विविध राशींच्या जीवनात मोठं वळण येत असतानाच आता चंद्र देखील आपली राशी बदलत आहे. ज्याचा परिणाम मे महिन्याच्या सुरूवातील विविध राशींवर पाहायला मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी? जाणून घ्या..

ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याची सुरूवात काही राशींसाठी(rashi) अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. तसं पाहायला गेलं तर चंद्र हा सर्वात वेगाने आपली राशी बदलण्यासाठी ओळखला जातो. चंद्र हा एक दिवसानंतर नक्षत्र बदलतो. चंद्राचे अडीच दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होते.

मे महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 मे रोजी चंद्राचे संक्रमण होईल. वैदिक पंचांगानुसार, गुरुवार, 1 मे रोजी पहाटे 3:14 वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत कोणत्या 3 राशींना नशीब मिळणार आहे? जाणून घ्या..

मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्राचे भ्रमण लाभदायक राहील. जीवनात सकारात्मक बदल होतील. नातेसंबंध दृढ होतील. व्यवसायात चांगले यश मिळवू शकाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. परदेशात जाण्याची योजना असू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. चांगला काळ सुरू होईल. नवीन कामात रुची वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.

कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यात रुची वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. पदोन्नतीसह उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वडिलांशी संबंध सुधारू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.

कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. जीवनात सकारात्मक बदल होतील. मन प्रसन्न राहील.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

मोठा घोटाळा ! कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार

बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

 देशात होणार जातनिहाय जनगणना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचा मोठा निर्णय