आई कामावर अन् घरी सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार आईला कळताच…

अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (stepfather)सावत्र बापाने १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याची माहिती मुलीच्या आईला समजताच तिने बापाला भररस्त्यावर बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने नारोळ पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीचे वडील वारले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. मुलींनाही बापाचं प्रेम मिळेल या हेतूने तिने दुसरे लग्न केले होते. मात्र, बाप हा नराधम निघाला. (stepfather) त्याचा डोळा आपल्याच सावत्र मुलीवर होता. त्याने १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तो तब्बल ४ वर्ष आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करत राहिला.

लहान मुलीकडून याची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईची तळपायाची आग मस्तकात गेली. पीडित मुलीने आपल्या आईला आपबिती सांगितली. पीडित मुलीची आई कामावर गेल्यानंतर नराधम बाप लवकर घरी घेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिली. तसेच नराधम आपल्या मुलींना मारहाण करून धमकीही देत असल्याची माहिती समोर आली आहे. (stepfather)पीडित मुलीने याची माहिती आईला दिल्यानंतर तिने थेट नारोळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

हेही वाचा :

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण? ‘या’ 3 नावांची चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भाकरी फिरणार? शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पुन्हा….