मुदाळतिट्टा- निपाणी, गारगोटी- कोल्हापूर मार्ग बंद
भुदरगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची(route maker) वाढ झाली आहे. परिणामी, मुदाळतिट्टा-निपाणी तसेच गारगोटी-कोल्हापूर या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मुरगुडच्या स्मशान शेडजवळ रस्त्यावर चार फुटांपेक्षा जास्त पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
मुरगुडचा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला|(route maker) असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे मुरगूड-कापशी मार्गावरील वाहतूक देखील बंद झाली आहे. सर पिराजी तलावाच्या क्षेत्रात आजपर्यंत 46 इंच 70 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 14 इंच 65 सेंटीमीटरने जास्त आहे.
करजींवने, अवचितवाडी, आणि पळशिवणे येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या तलावांच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या तीन गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी मुरगूड येथील स्मशान शेडपासून शिंदेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर आले आहे. यामुळे निढोरी, शिंदेवाडी, आणि मुरगूड येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निढोरी येथील पाच घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले असून तेथील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
निढोरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने रेस्क्यू टीम तयार करण्यात आली आहे. भुदरगडसह मुरगूड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून ग्रामस्थांनी महापूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. वाघापूर तालुका भुदरगड येथील बिरदेव मंदिरात चार फुटापर्यंत पाणी आले आहे. मुरगूड शहराच्या चारी बाजूंना पाणी असल्याने शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :
रस्ता चुकलात? मेटा AI होणार तुमचा आधार, कसं काय?
महायुती सरकारचा नवा निर्णय: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोफत गॅस सिलेंडर
दादांच्या बालेकिल्ल्यात भाईंची फिल्डींग; शिंदेसेनेत जोरदार इनकमिंग…