नणंद भावजयीचा एकमेकींवर जडला जीव कुटुंबियांनी ‘त्या’अवस्थेत पकडलं

नणंद आणि भावजयीचे एकमेकांवर प्रेम जडले. कालांतराने त्यांच्यात जवळीक वाढली. (attached)अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. हा धक्कादायक प्रकार घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात घडला.नणंद आणि भावजयीचे एकमेकांवर प्रेम जडले. कालांतराने त्यांच्यात जवळीक वाढली. दोघींचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की, त्यांनी अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. पण एकेदिवशी कुटुंबियांनी त्यांना नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर या प्रेम प्रकरणाचं बिंग फुटलं. पुन्हा असे कृत्य केल्यास खबरदार, असा सज्जड दम कुटुंबियांनी त्यांना दिला. पण दोघींनीही कुटुंबियाचं म्हणणं मनावर घेतलं नाही.

शेवटी दोघींना वेगळं करण्यासाठी कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडली. पोलिसांनी नणंद-भावजयीची समजूत काढावी, अशी विनंती कुटुंबियांनी केली आहे. प्रकरण ऐकूण पोलिसही चक्रावून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात राहणाऱ्या तरुणीचे लग्न झाले होते.(attached) काही दिवसाच्या सुखी संसारानंतर या महिलेने पतीसोबत दुरावा निर्माण केला. तिने अनेकदा पतीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. पत्नीचे वागणे पाहून पतीच्या मनात शंका निर्माण झाली.

त्याने पत्नीवर नजर ठेवली असता, त्याला समोर जे दिसलं ते पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकरली. आपली पत्नी आपल्याच बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचं तरुणाने बघितलं. त्याने दोघींनाही विचारण केली असता आपले एकमेकींवर प्रेम असल्याचं त्यांनी सांगितलं.

तरुणाने हा प्रकार कुटुंबियांच्या कानावर घातला. पुन्हा असे कृत्य करू नका नाहीतर आमच्या इतकं कुणी वाईट नाही, असा सज्जड दम कुटुंबियांनी दोघींनाही दिला. पण तरीही नणंद आणि भावजयीने आपलं नातं काही तोडलं नाही. दोघींनीही समलैंगिक संबंध सुरूच ठेवले.

अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. (attached)दोघींनाही दूर करा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. प्रकरण ऐकूण पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी नणंद आणि भावजयीला बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला. पण दोघीही एकमेकांपासून दूर होण्यास तयार नाहीये.

आम्हाला लग्न करून सुखी संसार करायचा आहे, असा हट्ट त्यांनी धरला आहे. नणंद भावजयीच्या या प्रेमप्रकरणामुळे पोलिसांची देखील चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. सध्या पोलीस याबाबत वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेत आहेत. या प्रेमप्रकरणाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

सांगली येथील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी!

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट