अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सोनाली(shower) कुलकर्णी दोघेही मराठी इंडस्ट्रीतील टॉपचे कलाकार आहेत. दोघे पहिल्यांदा सुशीला सुजीत या सिनेमातून एकत्र पाहायला मिळत आहेत. दोघांनी पहिल्यांदा एकत्र येत प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत. दोघांचा रोमँटीक अंदाज या गाण्यात पाहायला मिळतोय. सोनाली आणि स्वप्निल थेट शॉवरखाली रोमान्स करताना दिसत आहेत.

सुशीला-सुजीत असं त्यांच्या सिनेमाचं नाव असून त्यातील नॉटी नॉटी हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शॉवरखाली स्वप्निल आणि सोनाली रोमान्स करताना दिसत आहेत. सोनालीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.तिच्या केसांमधून ओघळणारं पाणी, डोळ्यांतली नजाकत आणि हलकासा बोल्ड टच पाहायला मिळतोय.
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’मध्ये बिग बॉसची गँग, ‘वाजीव दादा’ गाण्याचा कल्ला!
तर अभिनेता स्वप्निल जोशीला आपण नेहमीच प्रेमळ, (shower)सोज्वळ आणि गोड नायक म्हणून पाहिलं आहे. मात्र या गाण्यात तो एका हटके आणि जरा ‘नॉटी’ अंदाजात दिसतोय. चॉकलेटी रंगाचा शर्ट, नजरेतील तीव्रता आणि सोनालीकडे जाणारी त्याची रोमँटीक नजर या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या गाण्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय, “सोनालीला आशा गाण्यात imagine केले नव्हते पण छान.” तर काहींनी ट्रोल देखील केलं आहे.सुशीला सुजीत(shower) हा सिनेमा 18 एप्रिल 2025 रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओकनं केलं आहे. सिनेमा स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजीरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशी यांनी केली आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर विनयभंगप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी घरात बोलावून मुलीशी अश्लील चाळे
महिलेने 14 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट दातांनी चावला आणि मग जे घडले ते भयंकरच
उष्णतेच्या झळा अन् गारपिटीचं संकट एकाचवेळी! हवामान खात्याचा 9 जिल्ह्यांना इशारा