नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थानच्या ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले.(elephant)दरम्यान, हत्तीण नांदणी मठात राहण्यासाठी अनेकांनी सहकार्य केलं. परंतु, पेटा संस्थेने केलेल्या याचिकेचा निकाल मठाच्या विरोधात लागल्याने हत्तीला निरोप देण्यात आला. दरम्यान, तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांचे २०१८ सालचे हत्तीणीबाबतचे एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावर सकाळ ऑनलाईनने फॅक्ट चेक केला असून याबाबत शेट्टींनी खुलासा केला.

२०१८ सालामध्ये सदरचे पत्र हे वनविभागाला देण्यात आले होते. २०१८ साली हत्तीची काळजी घेण्यासाठी मठाकडे माहूत उपलब्ध नव्हता व हत्तीची प्रकृती बिघडत असल्याने त्याची देखभाल शक्य नव्हती. त्याच्या देखभालीसाठी योग्य व्यक्ती उपलब्ध नसल्याने नांदणी मठाच्या मागणीवरुन हे पत्र वनविभागाला देण्यात आले होते.(elephant)या हत्तीची देखभाल घेण्यासाठी वेळेत व्यक्ती उपलब्ध न झाल्याने त्याची देखभाल व्हावी या हेतूने मागणी करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाने या हत्तीची जबाबदारी स्विकारली नाही. यानंतर नांदणी मठाने योग्य माहूताची निवड केली. हत्तीची देखभाल सुरळीत झाल्याने हत्तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली.

यानंतर हत्तीची प्रकृती स्थिर झाल्याचा वैद्यकीय अहवाल ही न्यायालयात सादर करण्यात आले होते. मठाने योग्य हाताळणी करुन सुद्धा PETA या संस्थेने हत्तीच्या आरोग्य विषयक कारणावरुन उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. दरम्यान राजकीय हेतून खोडसाळ पणाने कोणीतरी हे जुने पत्र व्हायरल करत असल्याचे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.उपरोक्त विषयास अनुसरून जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी, येथे वनविभागाच्या परवानगीने वीस वर्षे उत्तमरीत्या हत्तीचे संगोपन केले आहे. तरी यापुढे हत्तीच्या वयोमानानुसार व हत्ती वाहक माहूत मिळणे कठीण आहे.(elephant)त्यामुळे हत्तीचे संगोपन व देखाभाल करणे कठीण आहे त्यामुळे त्याच्यां मागणी नुसार हत्ती वनसंग्रालयाकडे सोडणेसाठी, सहकार्य करावे ही विनंती. अशा आशयाचे २०१८ सालचे पत्र व्हायरल होत आहे.
हेही वाचा :