चित्रपट रिलीज झाला की प्रेक्षक थिएटरमध्ये धाव घेतात. कलाकारांच्या प्रेमापोटी, चित्रपटाची कथा आवडली (decision )असेल तर चाहते सिनेमा टिव्हीवर येण्याआधीच तो पाहण्यासाठी थिएटरमध्ये हजेरी लावतात. चित्रपट रिलीज होताच थिएटर बाहेर हाऊसफुलचा बोर्ड पाहायला मिळतो. मात्र आजकाल चित्रपटांचे दर एवढे वाढले आहेत की सर्वसामान्यांना त्याची किंमत परवडत नाही.आजकाल अनेक थिएटरमध्ये 400, 500 तर 600 च्यावर तिकिटांच्या किंमती पाहायला मिळतात. आता मात्र थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार आता फक्त 200 रुपयांत तुम्हाला थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. यासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व भाषांमधील चित्रपटांच्या तिकिटांच्या किंमती 200 रुपयांपर्यंत मर्यादित करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. (decision )मंगळवारी ही घोषणा करण्यात आली आहे. सरकारने कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये मल्टिप्लेक्ससह प्रत्येक शोसाठी तिकिटांची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त नसावी असे सांगितले आहे. ही मर्यादा सर्व भाषांमधील चित्रपटांना लागू होते.
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली की,” मल्टीप्लेक्ससोबत राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या शोच्या तिकिटाची किंमत 200 रुपयांपर्यंत मर्यादित केली जाईल.(decision )
” यासोबतच कर्नाटक सरकारने या प्रस्तावावर नागरिक, थिएटर मालक आणि इतर संबंधित पक्षांकडून 15 दिवसांत या निर्णयावर सूचना मागवल्या आहेत. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा निर्णय समान रीतीने लागू होईल. या निर्णयमुळे सर्वसामान्य लोक आनंदाने थिएटरमध्ये चित्रपट पाहू शकतील.
हेही वाचा :