UPI पेमेंट प्रणालीत लवकरच एक मोठा आणि क्रांतिकारी बदल घडणार आहे. NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने एक नव अपडेट आणण्याची तयारी केली आहे,(Payments) ज्यामुळे पिनशिवायही UPI पेमेंट शक्य होणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांच्या बायोमेट्रिक डेटाचा फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक स्मार्ट, सोपे आणि सुरक्षित होतील.सध्याच्या UPI प्रणालीमध्ये व्यवहार करताना 4 किंवा 6 अंकी पिन टाकणे आवश्यक असते. मात्र, हा पिन दुसऱ्याच्या हाती लागल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून NPCI आता बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा वापर करणार आहे. म्हणजेच, फेस आयडी वापरून चेहर्याच्या आधारे ओळख पटवली जाईल. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर वापरून अंगठ्याच्या टचवर व्यवहार होईल.

कारण पिन सहज मिळवता येतो, पण कोणाचाही चेहरा किंवा फिंगरप्रिंट कॉपी करणे कठीण असते. (Payments)त्यामुळे UPI फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, डेटा गोपनीयता, युजरची परवानगी आणि मजबूत तांत्रिक प्रणाली हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मोठ्या प्रमाणावर ही प्रणाली वापरात आणताना सुरक्षा आणि सिस्टम स्थिरता याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही. जसे UPI पेमेंट तुम्ही सध्या करता, तसंच ते चालू राहील.(Payments) NPCI कडून अधिकृत अपडेट आल्यानंतर तुमच्या अॅपमध्ये एक छोटा सेटअप प्रोसेस येईल, ज्याद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरू करता येईल.
हेही वाचा :