36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन रोमान्स, वडिलांच्या kiss मुळे मोडलं मुलाचं लग्न

एका कुटुंबात सगळे सदस्य जेव्हा चित्रपटसृष्टीशी जोडलेले (connected)असतात तेव्हा नाती जपणं कधी कधी कठीण होऊन बसतं. असंच काहीसं बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबात घडलं. ज्येष्ठ अभिनेत्याने एका तरुण अभिनेत्रीबरोबर चित्रपटात रोमान्स केला. पण त्याच ऑनस्क्रिन रोमान्समुळे त्याच्या मुलाचं खरंखुरं नातंच मोडलं. हा किसिंग सीन इतका चर्चेत आला की वडिलांच्या अभिनयाने मुलाच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 2005 मध्ये आलेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जीसोबत काम केलं. विशेष म्हणजे राणी त्यांच्यापेक्षा तब्बल 36 वर्षांनी लहान होती. या चित्रपटातील किसिंग सीनमुळे प्रेक्षकच नाही तर बच्चन कुटुंबही हैराण झालं. इतकंच नाही तर, या दृश्यामुळे(connected) अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचं प्रेमसंबंधही संपुष्टात आल्याचं बोललं गेलं.


‘ब्लॅक’ मधील बोल्ड सीनमुळे निर्माण झाला वाद संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ब्लॅक’ चित्रपटात एक इमोशनल किसिंग सीन होता. 60 वर्षांचे अमिताभ आणि 24 वर्षांची राणी यांच्यातील हा सीन तेव्हा खूप चर्चेत आलं. (connected)अभिषेक आणि राणीचं नातं त्या काळात गंभीर होतं पण या सीननंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

बॉलीवूडमध्ये चर्चा होती की अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचं लग्न होणार होतं. अभिषेकची आई जया बच्चन यांनीही या नात्याला मंजुरी दिली होती. पण ‘ब्लॅक’मधील किस सीनमुळे बच्चन कुटुंबात तणाव निर्माण झाला आणि हे नातं संपलं.
अमिताभ यांना चित्रपटासाठी पुरस्कार, पण मुलाच्या नात्याचं नुकसान?’ब्लॅक’ चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राणी मुखर्जीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण चित्रपटाचा हा एक सीन बच्चन कुटुंबात वादाचं कारण ठरला. काही रिपोर्ट्सनुसार, या सीनमुळेच अभिषेकने राणीपासून दुरावण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

जम्मू-काश्मीरमधून हादरवून टाकणारी बातमी समोर

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप

‘आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीत एकत्र असतील’; ‘या’ बड्या नेत्याचं विधान