विवस्त्र मुलीचा VIDEO कॉल उचलणं पडलं महागात

मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंद सिंग (unknowns)आणि दोन अज्ञात अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधित वृद्धाकडून तब्बल १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले आहेत. २३ मार्च ते २८ एप्रिल या काळात संदेशनगर, गारखेडा भागात हा प्रकार घडला. १४ लाखाहून अधिकची रक्कम देऊनही आरोपी आणखी जास्त पैसे मागत होते. अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून वृद्धाने पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध हे सेवानिवृत्त आहेत.(unknowns) २३ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास ते बाथरूममध्ये आंघोळ करत होते. त्याचवेळी त्यांना एका नंबरवरून व्हॉटस्अॅपवर व्हिडीओ कॉल आला. तो कॉल वृद्धाने उचलला असता समोरून पूर्ण नग्न अवस्थेतील एक तरुणी त्यांच्याशी बोलत होती. यावेळी वृद्धही अर्धनग्न होते. या अवस्थेतील व्हिडीओ कॉल तिने रेकॉर्ड केला.

त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना दुसऱ्या एका नंबरवरून हेमंत मल्होत्राचा कॉल आला. तुमचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमचे पोलीस प्रमोद राठोड साहेब तुम्हाला कॉल करतील, (unknowns)असं त्याने म्हटले. त्यानंतर राठोडने वृद्धाला कॉल करून तुम्हाला जेलमध्ये टाकतो, जेलमध्ये जायचे नसेल तर तुम्ही सेटलमेंटसाठी पैसे दे, अशी मागणी केली. यानंतर आरोपींनी वेळोवेळी फोन करून धमकी देत १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले. आरोपींनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातला असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

मोठा घोटाळा ! कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार

बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

 देशात होणार जातनिहाय जनगणना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचा मोठा निर्णय