पंतप्रधान मोदी आज २५ हजार महिलांसोबत साधणार संवाद

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर(women) आता सहाव्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मोर्चा उत्तर प्रदेशाकडे वळवला आहे. मोदी आज वाराणसी दौऱ्यावर जाणार असून तब्बल २५ हजार महिलांसोबत संवाद साधणार आहे.

सायंकाळी साडेचार वाजता मोदी वाराणसी येथील डॉ.संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात मातृशक्ती(women) परिषदेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात २५ हजार महिला सहभागी होणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाकडून एवढ्या मोठ्या संख्येने महिला संमेलन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे सर्व जबाबदाऱ्या महिलाच सांभाळणार आहेत. भाजपचा हा कार्यक्रम केवळ तसाच नाही, तर त्याला राजकीय महत्व देखील आहे. कारण, भाजपने वाराणसी लोकसभा मतदारसंघातील सर्व १००९ बूथमधून महिलांचा सहभाग सुनिश्चित केला आहे.

वाराणसीतील महिला मतदारांवर भाजप सुरुवातीपासूनच विशेष लक्ष देत आहे. पूर्वांचलमधील गाझीपूर, घोसी, भदोही, वाराणसी, जौनपूर, मच्छिलिशहर, बलिया, मिर्झापूर, आझमगढ, लालगंज, चंदौली, रॉबर्टसगंज आणि सलेमपूर लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या १ कोटी ५६ लाख ३४५ आहे.

येत्या १० दिवसात या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान या सर्व महिला मतदारांना संदेश देणार आहेत. विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या महिला आणि बचत गटांच्या महिलांशीही पंतप्रधान संवाद साधतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत नारी शक्ती संवाद कार्यक्रमातील स्टेज व्यवस्थापन आणि व्यवस्था यासह संपूर्ण जबाबदारी मातृशक्तीच्या खांद्यावर आहे. पंडालमध्ये मिनी इंडियाचे रूपही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोदी महिलांना काय संदेश देणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

सांगली;तीन वाहनांच्या विचित्र अपघातात मुलाचा अंत

बारावी नापासांसाठी पर्याय; ऋषभ ‘असा’ बनला करोडपती

उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानाला आग;