आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा!

भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावसकर हे इंग्लंड क्रिकेट(players) बोर्डावर जाम भडकले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20 वर्ल्डकप खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना आयपीएल सोडून लवकर मायदेशी परतण्यास सांगितले आहे. गावसकर यांनी आयपीएलचा हंगाम लवकर सोडणाऱ्या खेळाडूंवर आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डावर दंडात्मक कारवाई करण्याचा बीसीसीआयला सल्ला दिला.

सुनिल गावसकर मिड डे मधील कॉलममध्ये लिहितात की, ‘मी देशाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे(players) समर्थन करतो. मात्र जे खेळाडू फ्रेंचायजींना संपूर्ण हगामासाठी त्यांच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त करतात. मात्र आता ते माघार घेत आहेत. यामुळे फ्रेंचायजीचं नुकसान होत आहे. फ्रेंचायजी हे त्यांना एका हंगामासाठी एवढे पैसे देतात की तेवढे पैसे ते देशाकडून काही हंगाम खेळले तरी मिळवू शकत नाहीत.’

ते पुढे म्हणाले की, ‘फ्रेंचायजीने अशा खेळाडूंच्या फीमधून मोठी रक्कम कापून घ्यावी. याचबरोबर क्रिकेट बोर्डांना त्यांचे 10 टक्के कमिशन देखील देण्यात येऊ नये. जर बोर्ड आश्वस्त करून माघार घेत असतील तर त्यांना देखील दंडीत केलं पाहिजे. खरं सांगायचं तर क्रिकेट बोर्डांना प्रत्येक खेळाडूमागे 10 टक्के कमिशन हे फक्त आयपीएलमध्येच दिले जाते. जगात इतर कोठेही असं केलं जात नाही. बीसीसीआयच्या या उदारपणाचे कोणी आभार मानतं का? नाही नक्कीच नाही.’

काही आठवड्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जे खेळाडू टी 20 वर्ल्डकप संघात निवडले गेले आहेत त्यांना 22 मे पूर्वी मायदेशात दाखल होण्यास सांगितले होते. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 मालिका होणार आहे. त्यासाठी या सर्व खेळाडूंना मायदेशात परत बोलवण्यात आलं आहे.

हेही वाचा :

6 वर्षांत व्हायचंय लखपती तर फॉलो करा या टिप्स

KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माची सीक्रेट मीटिंग? अफवांच्या बाजारात चर्चांना उधान

गरीबांना 200 यूनिट वीज मोफत, वर्षभरात दोन कोटी नोकऱ्या; केजरीवाल यांच्या देशाला 10 गॅरंटी