कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आजही पूर्णपणे उघडीप दिली असली तरी शहरातील काही भागात हलक्या सरी कोसळल्या.(dam)तर प्रमुख धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस पडला. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात एक फूट नऊ इंचांनी घटली. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली आहेत.पावसाने आजही विश्रांती दिली. दिवसभर कडकडीत ऊन पडले. दरम्यान, दुपारी शहरातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्याचबरोबर राधानगरीसह कुंभी, पाटगाव, घटप्रभा, धामणी, चित्री धरणक्षेत्रात पाऊस पडला. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची सकाळी २२ फूट तीन इंच असणारी पाणीपातळी रात्री २० फूट चार इंचांवर आली.
आलमट्टी धरण ८० टक्के भरले
आलमट्टी धरण ८०.५७ टक्के इतके भरले असून, यामधून ९० हजार क्युसेक, कोयना धरण ७३.३३ टक्के भरले असून, त्यामधून ११ हजार ४०० क्युसेक व वारणा धरण ८२ टक्के भरले असून, (dam)त्यामधून सात हजार ४० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरण ९० टक्के भरले
राधानगरी तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी ३४३ फुटांपर्यंत गेले असून, ३४७.५० फुटाला धरण पूर्ण क्षमतेने भरते.
शुक्रवारी धरणात साडेसात टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण १९ टीएमसी म्हणजे ७४.२५ टक्के इतके भरले आहे. (dam)नियोजित पाणीसाठ्याला तीन टीएमसी कमी असून, याही धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
हेही वाचा :
- भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज! मालिकेत टीम इंडीयाची 1-0 अशी आघाडी
- 20 जुलै रोजी रविवारी तिन्ही मार्गांचा मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी ‘हे’ वाचा
- सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या भावात घसरण! जाणून घ्या आजच्या किंमती
- वैष्णवी हगवणे न्यायप्रकरणी मोठा ट्विस्ट! IPS सुपेकर सहआरोपी करण्याच्या शिफारशीने खळबळ