राज्यात अनेक ठिकाणी पावसाने( rain alert ) धुमाकूळ घातला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि कोकणातील काही भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. तापमानात पुन्हा वाढ होत आहे. परंतु, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
पुढील 24 तासांत सातारा, सांगली, कोल्हापूर घाटमाथ्यावर वादळ वाऱ्यासह पावसाचा( rain alert ) इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल अशी माहिती हवामानतज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी दिली.
तर दुसरीकडे मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याने शेतकरी आता चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्यातरी दमदार पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. सध्या माहितीनुसार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिके सुकत असून वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- Samsung ला टाकलं मागे! या कंपनीने लाँच केला ट्राय-फोल्ड फोन
- सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या! चांदीच्या भावात घसरण
- दत्ताजी नलावडे यांनी वरळीत उभारलेल्या शिवालयासाठी एक कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा
- साक्षीचं आता काही खरं नाही! ‘परफेक्ट’ पुरावा सादर करताना अर्जुनच्या खोटेपणाला पोलिसांचीच साथ