मातोश्रीवर राज ठाकरे यांची उध्दव ठाकरे यांच्याशी ऐतिहासिक भेट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण आज घडला, जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. (meeting )ही भेट उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झाली असून, काही वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ही भेट घडल्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.(meeting)  एकेकाळी एकत्र असलेल्या ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरते. माजी खासदार बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये ही भेट म्हणजे “1+1=11” असल्याचं नमूद करत ही शक्ती एकत्र आल्यास भविष्यात मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो असा सूर लावला.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला आणि सांगितलं की आज आपण खरंच हवे होतो.(meeting)या भेटीमुळे ठाकरे कुटुंबीयांमध्ये नवे मैत्रीपूर्ण पर्व सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघेही बंधू पुन्हा एकत्र आल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :