कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला!

दोन अधिकृत उमेदवार(candidate) देऊनही उमेदवारच नाही, अशी स्थिती झालेल्या काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमध्ये तगडा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये पहिल्या दहा ते बारा फेऱ्यांमध्ये मागे पडून सुद्धा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी विजय खेचून आणला आहे.

काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार(candidate) राजेश लाटकर यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात तगडी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरमधून विजय मिळवला आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांची फाईट राज्यात चर्चेचा विषय होती. अखेरच्या टप्प्यामध्ये प्रियांका गांधी यांची सभा सुद्धा गांधी मैदानामध्ये पार पडली होती. त्यामुळे या निकालाकडे निकालाकडे राज्याचे लक्ष होतं. मात्र या ठिकाणी क्षीरसागर यांना बाजी मारण्यामध्ये यश मिळालं आहे.

हेही वाचा :

पराभव दिसताच संजय राऊतांचे EVM वर खापर; मिम्सचा तुफान हल्ला!

कोल्हापूर दक्षिणमध्ये जल्लोष; अमल महाडिकांचा विजय…

12 व्या फेरीअखेर भाजपचे राहुल आवाडे 32996 मतांनी आघाडीवर विजयाची दिशेने वाटचाल