‘संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय’ म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी
उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांबरोबरच (political)अदानी समूहावर तीव्र निशाणा साधला आहे. ‘सामना’मधील रोखठोक सदरामधून राऊत यांनी गंभीर टीका करताना संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी भूखंडांच्या संदर्भात धक्कादायक दावे करताना काही भूखंडांची यादीच शेअर केली आहे.
धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली…
“धारावी हा आता मुंबईसाठी संघर्षाचा मुद्दा बनला आहे. निदान धारावी मराठी माणसांच्या हातात राहिली तरच मुंबईत आपल्याला मुक्तपणे वावरता येईल. धारावी ही यापुढे मुंबईची युद्धभूमी होणार आहे. कारण धारावी पुनर्वसन प्रकल्पाची सर्व मलई भाजप, शिंदे आणि गुजरातचे लाडके उद्योगपती खाणार आहेत,” असा दावा राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या विकासकांना संधी का नाही?
“धारावीचा विकास राज्याच्या गृहनिर्माण विभागाला करता आला असता. महाराष्ट्रातील विकासकांना एकत्र करून ‘क्लस्टर’ पद्धतीने धारावीचे पुनर्निर्माण केले असते तर महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रातच राहिली असती. धारावीच्या आठ लाख लोकांना 500 फुटांचे निवास मिळाले असते, पण धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई एक-दोन उद्योगपतींच्या घशात घालण्याची योजना धोकादायक आहे,” असं राऊत म्हणालेत.
राजकीय आणि आर्थिक मुद्दे
राऊतांच्या या आरोपांमुळे मुंबईच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धारावीचा पुनर्विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर राजकीय आणि व्यावसायिक रस्सीखेच सुरु आहे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे या मुद्द्यावर आणखी जोरदार चर्चा होणार हे नक्की.
हेही वाचा:
चिन टपाक डम डम : छोटा भीममधून आलेला डायलॉग सोशल मीडियावर का व्हायरल होतोय?
लहान मुलांच्या दुधात साखर? तज्ज्ञांचा सल्ला : टाळा गोडवा, वाढवा आरोग्य!
राजघराण्यातील ‘या’ अभिनेत्रीचा MMS लीक; गंभीर आरोप…