थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!
वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. या महिन्यात अनेक नियम लागू होतात. कारण वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून 31 साजरा(celebrating) केला जातो. त्यामुळे अनेक नागरिक बाहेर फिरायला जातात तर काही नागरिक हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करता. त्यामुळे अनेकजण काहीना काही कारणामुळे घराबाहेर पडतात. मात्र या पार्श्वभूमीवर एफडीएने एक मोठं पाऊल उचललं आहे.
31 च्या या पार्टी दरम्यान संधी साधून निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये, तसेच अन्नातून कोणालाही विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीए हॉटेल, रेस्टॉरंट व क्लबवर बारकाईने नजर ठेवणार आहे. त्यामुळे आता 5 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये एफडीए विशेष तपासणी करण्याची मोहीम हाती घेणार आहे.
मात्र या मोहिमेदरम्यान रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आणि उपहारगृह या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यासंदर्भात खातरजमा करण्यात येणार आहे(celebrating). याशिवाय या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 यामधील तरतुदींनुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या कालावधीदरम्यान अन्नपदार्थांची गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची सविस्तर तक्रार प्रशासनाच्या मोफत क्रमांक 1800222365 वर करावी असे आवाहन देखील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता 31च्या पार्टीसाठी हॉटेल किंवा पबमध्ये जाताना जपून जा असा सल्ला देखील अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकांना दिला आहे.
हेही वाचा :
विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ
IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला
राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी