शुभमन गिलसोबत विवाहबद्ध होणार रिद्धीमा पंडित? अभिनेत्रीने मौन सोडत सांगितले…

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्या अफेअरची(pandit) चर्चा रंगत असते. सध्या टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ शुभमन गिल हा देखील चर्चेत असतो. शुभमन गिल याचे सारा सोबत नाव जोडले जात असताना दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री रिद्धीमा पंडितसोबत शुभमन गिल विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता, यावर अभिनेत्री रिद्धिमाने आपले मौन सोडले आहे.

टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित(pandit) आणि क्रिकेटर शुभमन गिल यांचे लग्न होणार असल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वतः रिद्धिमाने यावर प्रतिक्रिया दिली. रिद्धिमा आणि शुभमन या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. मात्र, आपल्या लग्नाच्या चर्चा निराधार असल्याचे अभिनेत्रीने म्हटले.

एका न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, रिद्धिमाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने शुभमनसोबतच्या लग्नाबाबत भाष्य केले. तिने म्हटले की, आज मला माझ्या लग्नाबद्दल अनेक पत्रकारांच्या कॉल्सने जाग आली. पण लग्न कुणाचं? मी लग्न करत नाही आणि माझ्या आयुष्यात असा क्षण कधी आला तर मी स्वत: सर्वांसमोर नक्कीच जाहीर करणार. मात्र, सध्या या बातमीत कोणतेही तथ्य नाही असेही रिद्धिमाने सांगितले.

टीम इंडियाचा ‘प्रिन्स’शुभमन गिलच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतात. शुभमन आणि सारा तेंडुलकर यांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा होती. त्याच वेळी सारा अली खानला शुभमन डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, शुभमन गिल अथवा सारा तेंडुलकर किंवा सारा अली खानकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नाही.

रिद्धिमा पंडित ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. रिद्धिमाने ‘हमारी बहु रजनीकांत’ आणि ‘खतरा-खतरा’ सारखे शो केले आहेत. 2019 मध्ये तिने फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी 9 या रिएल्टी शोमध्येही सहभाग घेतला होता. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये ती स्पर्धक म्हणूनही आली होती.

हेही वाचा :

कोल्हापूर हातकणंगले कार्यकर्त्यांची वाढली उत्कंठा ! कोण मारणार बाजी…

रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते…!

ठाकरे- पवार इज बॅक… आता बंडखोर काय करणार?; विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी?