अजित पवारांच्या हातात फक्त 15 दिवस…

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थतता असल्याच्या बातम्या आहेत. (reports)आज रोहित पवार यांनी खूप सूचक विधान केलय. अजित पवार गट सोडण्यासाठी आमदारांना एक डेडलाइन दिलेली आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणालेत ते जाणून घ्या.लोकसभा निवडणूक निकालानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थतता असल्याच्या बातम्या येत आहेत. काल अजित पवार यांनी मुंबईतील ‘ट्रायडेंट’ हॉटेलमध्ये पक्षाच्या 40 आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला 5 आमदारांनी दांडी मारली.

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीच या बैठकीत मंथन करण्यात आलं. आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अण्णा बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम हे आमदार या बैठकीला नव्हते. हे आमदार का गैरहजर होते? त्याची कारण त्यांनी पक्षाला कळवली. पण यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलय. त्यामुळे अजित पवारांच टेन्शन नक्कीच वाढणार आहे.

“अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांना 15 दिवसात निर्णय घ्यावा लागणार आहे. शरद पवारांनी अजित दादांच्या मंत्र्याच्या मतदारसंघातील उमेदवार ठरवले आहेत” असं रोहित पवार म्हणाले. “आज चर्चा आहे, पुढच्या 15 दिवसात काय होतं ते बघा.(reports) दादा, पक्षाचे मोठे नेते पुढे बसलेले असताना आमदार काय बोलणार? पुढच्या 15 दिवसात निर्णय घ्यावा लागेल. साहेबांनी विधानसभेची तयारी सुरु केलीय” असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार कर्जत-जामखेड सोडणार का?

“30 उमेदवार साहेबांनी ठरवलेत. काही मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल झालेत. 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यातले किती घ्यायचे ते शरद पवार साहेब (reports)आणि जयंत पाटील ठरवतील” असं रोहित पवार म्हणाले. “मी बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही. मी कर्जत-जामखेड सोडून जाणार नाही. कर्जत-जामखेडने मला ओळख दिली. संघर्ष करायला शिकवल. बारामतीमधून पवार साहेब योग्य उमेदवार देतील” असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा :

आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’

 राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर

विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा

लोकसभेच्या निकालानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आरबीआयकडून नवा रेपो रेट जाहीर

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरी, १० तोळे सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला