महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू तस्कराकडून शिवीगाळ अन् धक्काबुक्की; तीन जणांवर गुन्हा दाखल

कुर्डुवाडी : अवैध वाळू(sand) उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंगला गेलल्या महिला प्रांताधिकारी यांच्या शासकीय वाहनाला आपले वाहन आडवे लावून महिला प्रांताधिकाऱ्यांच्या अंगावर जात शिवीगाळ व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना दि. २३ रोजी पहाटे १२.३० ते १.४५ वा सुमारास रोडवरील वरवडे टोल नाक्यानजीक घडली. याबाबत ग्राम महसूल अधिकारी ( कुर्डुवाडी) प्रवीण किसन बोटे यांच्या फिर्यादीवरुन टेंभुर्णी पोलिसांत अण्णा पाटील शिराळ टें ता.माढा, अप्पा पराडे बाबुळगाव ता.माळशिरस, गणेश सोमनाथ काशीद परितेवाडी ता.माढा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबरोबरच प्रांताधिकारी यांच्या पथकाकडून वाळू(sand) वाहतूक करताना पकडलेला बिगर नंबरचा टिपर व ४ब्रास वाळू असा एकूण २ लाख २८ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर व त्यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, मंडल अधिकारी विशाल गायकवाड,सूर्यकांत डिकोळे फिर्यादी ग्राम महसूल अधिकारी प्रवीण बोटे, महसूल सेवक नवनाथ शिंदे, चालक अतुल दहिटणकर असे सर्व पथक अवैध वाळू वाहतूक व उत्खनन रोखण्याकरता जात होते.
दि.२३ रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी -भोसरे- घाटणे-लऊळ- उजनी मा- वरवडे – यामार्गे टेंभुर्णीकडे जात असताना पुणे – सोलापुर रस्त्याच्या लाईनवरून एक वाळूचा(sand) टिपर सोलापुरच्या दिशेने जात असताना दिसला. यावेळी प्रांताधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे यु टर्न घेऊन वाळूच्या टिपरचा पाठलाग करुन वरवडे टोल नाक्याजवळ टिपर थांबवण्यात आला. यावेळी टिपर चालक पळून जात असताना त्याला पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत पकडले असता त्याने त्याचे नाव गणेश सोमनाथ काशीद असे सांगितले. प्रांताच्या पथकाने टिपरची पाहणी केली असता एकूण ४ ब्रास वाळू आढळून आली. दरम्यान टिपर चालक कोणाला तरी फोन लावून आपला टिपर पकडला आहे असे सांगत होता.

सदर टिपरबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने अप्पा पराडे यांचा टिपर असून टिपरमधील वाळू अण्णा पाटील यांच्या शिराळा टेंभुर्णी येथील खड्ड्यावरुन आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाकडून सदर चालकासह वाळूने भरलेला टिपर टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडे आणत असताना वरवडे टोल नाक्याच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर पांढऱ्या रंगाची अल्कायझर गाडी क्रमांक ७ मधून कोणीतरी वारंवार हातवारे करत प्रांतांची शासकीय गाडी थांबविण्याचा प्रयत्न करत होता.
तोपर्यंत पांढऱ्या रंगाची फाॅर्च्यनर गाडी क्रमांक एम एच ४२ बी ३३९६ या गाडीतूनही कोणीतरी शासकीय गाडीला हात करुन थांबविण्याचा प्रयत्न करत होते. प्रांतांची गाडी थांबत नसल्याचे दिसताच संबंधित फार्च्यूनर गाडीतील इसमाने रोडवर गाडी आडवी लावून रस्ता बंद करुन टाकला. त्यावेळी प्रांताधिकारी यांच्यासह पथकातील सर्व कर्मचारी खाली उतरले व प्रांताधिकारी यांनी वाहने का अडवली आणि तू कोण आहे असे विचारले असता समोरील व्यक्तीने अण्णा पाटील आहे असे म्हणत प्रांताधिकारी यांना उद्देशून तुझी दहशत लै झाली आहे.

तू माझ्याच खड्ड्यावरील वाळूच्या(sand) गाड्या सारख्या अडवितेस म्हणून शिवीगाळ करुन महिला प्रांताधिकारी यांना धक्काबुक्की करत पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत अप्पा पराडे व टिपर चालक देखील होते. टिपर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यानंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यास फोन केला व पोलिस आल्याचे पाहून ते वाहनासह पळून गेले. सदर पथकाने पोलिस बंदोबस्तात टिपर व टिपरवरील चालकास टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आणले.
हेही वाचा :
चिकन खात असाल तर आत्ताच व्हा सावध; ‘बर्ड फ्लू’ ने टेंशन वाढवलं
उर्फी जावेदचा पोल डान्स करताना गेला तोल! Video पाहून चाहते थक्क
तुमच्या शरीरावरील ‘हे’ तीळ सांगतात, तुमचे लग्न लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज!