‘युज ॲन्ड थ्रो’ ही भाजपची पॉलिसी, ते शब्द पाळत नाहीत…; मुख्यमंत्रिपदावरुन संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली असली तरी राजकारण(political news today) रंगलेले आहे. निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला आहे. ऐतिहासिक निकाल मिळवल्यानंतर देखील महायुतीने अद्याप राज्यामध्ये सरकार स्थापन केलेले नाही. यामुळे आता शिंदे गट व भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. यावरुन आता महाविकास आघाडीचे नेते व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपची पॉलिसी ही ‘युज ॲन्ड थ्रो’ अशीच आहे. भाजप कधीच दिलेला शब्द पाळत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यामध्ये विधानसभेचे(political news today) मुदत उलटून गेल्यानंतर देखील दुसरे सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे महाविकास आघाडीने महायुतीला घेरले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची ही प्रवृत्ती असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “तीन पक्षांच्या या महायुतीला सैतानी बहुमत मिळाले आहे. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या तंगड्यांमध्ये तंगडं अडकवण्याचा आणि छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरु आहे,” असा घणाघात संजय राऊत म्हणाले आहे.

दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरुन देखील राऊतांनी निशाणा साधला. खासदार संजय राऊत म्हणाले की, “दिल्लीचे जे शूरवीर आहेत, भाजपचे नेतृत्व, त्यांनी डोळे वटारले की आत्तापर्यंत सगळे गप्प बसत होते. पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे बंडखोर, जी भुतं निर्माण केलीत ती आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना पाहून गप्प बसत नाहीत. ते मोदी आणि शहानांच आव्हान देत आहेत असंही दिसतंय. भाजपाला पाशवी यश मिळालं आहे. असं पाशवी यश देशाला आणि राज्याला घातक असतं. यामुळे भ्रष्टाचार वाढतो, हुकूमशाही वाढते,” असे मत संजय राऊत यांनी मांडले.

2019मध्ये ठाकरे गटामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाले होते. आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु आहे. यावर संजय राऊत यांनी भाजपची हीच प्रवृत्ती असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, “भाजपाची भूमिका ही गरज सरो आणि वैद्य मरो किंवा वापरा आणि फेका अशी आहे त्यामुळे त्यांनी काय शब्द दिला असेल तो काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

त्याचा सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला भोगावा लागला आहे. शब्द पाळणं हे भाजपाला मान्य नाही ते कधीही शब्द पाळत नाहीत. ती नैतिकता भाजपाकडे उरलेली नाही. पक्ष फोडण्यासाठी एखाद्याची गरज असते तेव्हा आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात. त्यानंतर काम झालं की त्या व्यक्तीला लाथा घालतात हे महाराष्ट्राला दिसलं आहे,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा