शुभमन गिलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सारा तेंडुलकरला मिळाला नवा जोडीदार?

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा(Sara Tendulkar) अनेकदा चर्चेत असते. कधी ती तिच्या फोटोमुळे, कधी सोशल मीडियावरील तिच्या अॅक्टिव्हिटीमुळे तर कधी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा साराचे नाव नवीन रिलेशनशिपमुळे कारणामुळे चर्चेत आहे.

साराला एक नवीन प्रेम सापडले आहे अशी चर्चा सुरु आहे. आधी तिचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडले जात होते. आता तिचे नाव बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासोबत जोडले गेले आहे. आजकाल बॉलिवूडमध्ये एका नवीन नात्याबद्दल खूप चर्चा आहे. कोण आहे हा बॉलिवूडचं अभिनेता जाणून घेऊयात…

एका रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) एकमेकांना डेट करत आहेत. फिल्मफेअरच्या एका रिपोर्टनुसार, या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. एकत्र स्पॉट झाल्यामुळे असे अनुमान लावले जात आहेत की ते बी-टाउनचे नवीन जोडपे असू शकतात.

तथापि, अहवालात सूत्रांचा हवाला देऊन असा दावाही करण्यात आला आहे की सारा आणि सिद्धांत सध्या त्यांचे नाते सामान्य चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवत आहेत. सिद्धांत त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो, तर सारा तिच्या ग्लॅमरस शैलीमुळे अनेकदा चर्चेत असते.

चाहत्यांच्या नजरेपासून नातं दूर ठेवण्यासाठी दोघेही सध्या इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नाहीयेत. चाहते इंस्टाग्रामवर फॉलो-अनफॉलो सारख्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष देतात. अलिकडेच, साराच्या बाबतीत हेच घडले. तिने आणि भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने एकमेकांना अनफॉलो केले. सारा आणि शुभमन गिल यांच्यातील नात्याची बातमी गेल्या २-३ वर्षांपासून सतत येत आहे. पण अलिकडेच अनफॉलो केल्यानंतर, त्यांच्या ब्रेकअपची चर्चा आहे.

करियरबद्दल बोलायचे झाल्यास, सिद्धांत चतुर्वेदीचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. गली बॉयमधील त्याच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी समीक्षकांची प्रशंसा त्याला मिळाली. पण त्याचा अलीकडील चित्रपट, युद्ध, बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता तो तृप्ती डीमरीसोबत ‘धडक २’ च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असेल.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ

राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा