कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने शहरात आपली ताकद वाढवण्याचा मोठा डाव साधला आहे.(strength ) काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी करवीर विधानसभा निवडणुकीत लढवणारे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे, तसेच ‘सिटीझन फोरम’चे प्रसाद जाधव, अभिषेक बोंद्रे, वैभवराजे भोसले, राजेंद्र थोरवडे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.
या प्रवेशावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, (strength )अंबरिष घाटगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.दिलीप पोवार हे पाच वेळा नगरसेवक राहिले असून, त्यांच्या पत्नी सरस्वती पोवारही नगरसेवक होत्या. उत्तम कोराणे यांनी शिवाजी पेठेतून नगरसेवक म्हणून चांगले काम केले होते. या प्रवेशामुळे भाजपची ताकद शहराच्या मध्यवर्ती भागात वाढणार आहे.
संताजी घोरपडे यांनी करवीर मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि ७८०० मते मिळवली होती. (strength )नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय सोपा केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आमदार डॉ. विनय कोरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हालचालींमुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :