आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’
महाविकास आघाडीचे बलस्थान असणाऱ्या इस्लामपूर, हातकणंगले आणि शिराळा (landslide.) मतदारसंघात सत्यजित पाटलांची पीछेहाट झाली.हातकणंगले लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आघाडीवर असताना शेवटच्या फेरीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी मुसंडी मारत विजय पटकावला.
हातकणंगलेमधील इचलकरंजी, शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. महाविकास आघाडीचे बलस्थान असणाऱ्या इस्लामपूर, हातकणंगले आणि शिराळा मतदारसंघात सत्यजित पाटलांची पीछेहाट झाली. तर सत्यजित पाटलांचे होमटाऊन असलेल्या पन्हाळा, शाहूवाडी मधून अपेक्षा पेक्षा कमी मताधिक्य मिळाले. आमदार विनय कोरे यांना मताधिक्य रोखण्यात यश आले आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात (landslide)सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीचे होते. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे अशी बलाढ्य पॉवर महाविकास आघाडीकडे असताना महायुतीचे उमेदवार खासदार माने यांना 17 हजार 493 इतके मताधिक्य मिळाले आहे.
हातकलणंगलेच्या निकालामुळे महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदारांकडे बोट दाखविण्याची वेळ आली आहे. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार अमल महाडिक यांची ताकद निर्णायक ठरली आहे. शिवाय जनसुराज्यकडून इच्छुक असलेले डॉ. अशोकराव माने यांनी केलेली बेरजेचे गणितं देखील तितक्याच यशस्वी ठरली आहेत. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पीछेहाट झाल्याची पाहायला मिळते.
वास्तविक पाहता या मतदारसंघात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या सम समान आहे. त्यातील मुस्लिम आणि दलित समाजातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (landslide)सरूडकर यांना पाठिंबा दिला होता. तर जैन लिंगायत आणि मराठा समाज हा महायुतीच्या बाजूने उभा राहिल्याचं चित्र आहे.
एकंदरीतच या निकालामुळे महाविकास आघाडीचे विधानसभेची वाटचाल खडतर बनली आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आजी-माजी आमदारांतील काही गटांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते. त्यातूनच महायुतीच्या पथ्यावर हातकणंगलेतील मते पडली.
हेही वाचा :
पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण
टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी
मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार
निकाल काहीही लागो, आमचा विठ्ठल एकच समर्थकांची बॅनरबाजी
राजीनामा कशाला देताय, जनतेनेच तुम्हाला घरी बसवलंय; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल