धक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेत आईनं स्वत:लाही संपवलं

गंगासागर आणि महादू यांचा संसार सुरळीतपणे सुरु असताना अचानक (mental)गंगासागर उगले हिला मानसिक आजार झाला. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.जन्मदात्या आईनेच पोटच्या 5 वर्षीय मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गंगासाग महादू उगले 28 आणि अंश महादू उगले 5 अशी मृतांची नावे आहेत. जालना जिल्ह्यातील आरदखेडा गावात ही घटना घडली आहे. 

दोघेही पती-पत्नी संभाजीनगर

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आरदखेडा गावात एक घटना उघडकीस आली आहे. आरदखेडा येथील दिलीप उगले यांचा मुलगा महादू उगले यांचा विवाह 2013 मध्ये भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील महादू कुदर यांची कन्या गंगासागर यांच्याशी झाला. महादू(mental) उगले हा छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कंपनीत नोकरीला होता. त्यामुळे ते दोघेही पती-पत्नी संभाजीनगरला राहत होते. 

पत्नी मानसिक आजाराने ग्रस्त

गंगासागर आणि महादू यांचा संसार सुरळीतपणे सुरु असताना अचानक गंगासागर उगले हिला मानसिक आजार झाला. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नव्हती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तिचा पती महादू उगले यांनी मुलगा अंश आणि पत्नी गंगासागर यांना आदरखेडा येथे आई-वडिलांकडे आणून सोडले होते. 

गळफास घेत संपवले जीवन

गंगासागर हिच्यावर खासगाव आणि विदर्भातील सैलानी या ठिकाणी उपचार सुरु होते. पण त्याचा कोणताच उपयोग झाला नाही. गंगासागर उगले, मुलगा अंश आणि सासू-सासरे घराबाहेर अंगणात (mental)झोपलेले होते. तेव्हा गंगासार हिने घरातील पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने मुलगा अंशला गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. 

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

दरम्यान हा सर्व प्रकार आज सकाळी सर्वांच्या लक्षात आला. यावेळी जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर हत्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी गजानन उगले यांच्या तक्रारीवरुन जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाहारी तायडे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला ‘गेम’

 राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर

विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा