आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी रंगला. मात्र या सामन्यात क्रिकेटप्रेमींनी एक अनपेक्षित दृश्य पाहिलं. ये दृश्य सध्या सोशल मीडियावर(social media) जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्याच्या टॉसदरम्यान गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या यांच्यात सगळं काही अलबेल दिसलं नाही. हे त्यांच्या फॅन्सने नोट केलं.
नक्की काय झालं?
सामन्याच्या आधी टॉसदरम्यान शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. एवढंच नाही तर टॉस झाल्यावर दोघांनी हातही मिळवला नाही. हार्दिक पांड्या टॉसचा निकाल लागल्यानंतर शुभमन गिलकडे वळला. त्याला बघून असं वाटलं की तो, जणू हातमिळवणीसाठी पुढे येत आहे. पण गिल काहीसा गडबडला आणि तयार हात पुढे केला नाही. त्यानंतर हार्दिक पांड्या थेट कमेंटेटर रवि शास्त्रीकडे गेला आणि त्यांच्याशी बोलायला लागला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणातच सोशल मीडियावर(social media) व्हायरल झाली.
चर्चांना उधाण
घडलेली घटना इतकी स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाली होती की सोशल मीडियावर लगेचच “गिल आणि पांड्या यांच्यात वाद?” अशा चर्चांना उधाण आलं. दरम्यान, टॉसच्या काही वेळानंतर MI चे बॅटिंग कोच किरोन पोलार्ड हार्दिककडे गेला आणि त्यांच्याशी हात मिळवला. काही चाहत्यांनी यावर मिश्किल रिअक्शन दिल्या की पोलार्ड जणू गिलला दाखवून दिलं की “हात मिळवला कसा जातो”
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and elected to bat first against @gujarat_titans
Updates ▶️ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/E3G3NU0FXK
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
या घटनेनंतर सामन्यादरम्यान आणखी एक प्रसंग घडला ज्याने चर्चेला आणखी उधाण दिलं. मुंबईकडून पहिला ओव्हर टाकत असलेल्या ट्रेंट बोल्टने शुभमन गिलला इन-स्विंगरवर थेट LBW करत गोल्डन डकवर बाद केलं. गिल बाद होताच हार्दिक पांड्या प्रचंड जोशात आला आणि गिलसमोरच जोरदार सेलिब्रेशन केलं . अनेकांनी या सेलिब्रेशन “सेंड-ऑफ” असं नाव दिलं.
कसा रंगला सामना?
सामन्याच्या निकालाकडे पाहिलं तर गुजरात टायटन्सने 229 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 208 धावा केल्या आणि IPL 2025 मधून बाहेर पडले. सध्या सोशल मीडियावर गिल-पांड्या संबंधांवरून जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्यात खरोखरच काही बिनसलंय का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हेही वाचा :
- लिव्हर आणि किडनीमध्ये जमा झालेली घाण साफ करतील 5 ड्रिंक्स
- माझं आयुष्य जगू द्या समांथा रुथ प्रभूला झाला हा गंभीर आजार
- कोविड रुग्णांची संख्या 2700 च्या पुढे, 7 मृत्यूंची नोंद; केरळ, महाराष्ट्र अन् दिल्लीला हायअलर्ट