शुबमन गिल लवकरच लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

आयपीएल 2025 च्या रंगतदार सामन्यांमध्ये मैदानावरच्या खेळाइतकाच टॉसच्या क्षणांमधील मजेशीर संवादही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यंदा चर्चेत आहे गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल, ज्याला टॉस दरम्यान थेट लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न विचारणारे होते आयपीएलचे लोकप्रिय टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसन, आणि गिलने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यापूर्वी ईडन गार्डन्सवर झालेल्या टॉसदरम्यान मॉरिसनने गिलला विचारलं, “तू लवकरच लग्न करणार आहेस का?” यावर गिल हसून म्हणाला, “नाही, असं काही नाहीये.” या छोट्या उत्तराने प्रेक्षकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

डॅनी मॉरिसन हे त्यांच्या हटके आणि धाडसी प्रश्नांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी सर्वसामान्य क्रिकेटविषयक प्रश्न न विचारता थेट गिलच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारला, जो अनेकांना अनपेक्षित वाटला. सोशल मीडियावर चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले, “फक्त डॅनी मॉरिसनच हे विचारू शकतो!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *