…म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस(political issue) शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्य्स्फोट केला आहे. सध्या शरद पवार हे राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. मात्र यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात एक गौप्य्स्फोट केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीमध्ये(political issue) महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, 2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, परंतु असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, 2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळून देखील मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेस पक्षाला दिलं. मात्र त्यावेळी ‘सिनिअर’ म्हणून छगन भुजबळांचं नाव माझ्यापुढे होतं. परंतु छगन भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा.त्यानंतर त्यांना तुरूंगात देखील जावं लागलं आहे. मात्र त्या काळात छगन भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था ही अत्यंत चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
याशिवाय 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न गेल्याची खदखद उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने बोलून दाखवतात. तसेच शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्टच करत आपण मंत्रीपदं जास्त घेतल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होत.
कारण जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजित पवार हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले असं सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा शरद पवार यांनी अधोरेखित केला होता.
हेही वाचा :
कोल्हापूरात राज्य उत्पादक विभागाची मोठी कारवाई !
Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ
हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?