BSNL चा खास प्लॅन, किंमत 800 रुपयांपेक्षा कमी, 300 दिवसांसाठी रिचार्जचं नो टेन्शन

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि Vi ने अलीकडच्या काही महिन्यांपासून एकापाठोपाठ एक दर वाढवल्यानंतर संतापलेले युजर्स BSNL सरकारी कंपनीकडे वळत आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या(plan) किंमती वाढवल्यानंतर युजर्सकडून बराच काळ सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत होता. मात्र, दुसरीकडे BSNL ने या स्पर्धेत कडवी टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. यातच एक खास प्लॅन आला आहे. तोही तुमच्या बजेटवाला, तो प्लॅन नेमक्या कोणत्या सुविधा देतो, याविषयी खाली जाणून घ्या.

सध्या सरकारच्या मालकीच्या म्हणजेच BSNL कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त प्लॅन्स(plan) आहेत. हे प्लॅन्स युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि भरपूर डेटा बेनिफिट्स तर देतातच, शिवाय कमी किंमतीत जास्त काळ वैधतेचा देखील फायदा देतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका जुन्या पण व्हॅल्यू फॉर मनी प्लॅनची माहिती देत आहोत, जे तुम्हाला 300 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह इतर अनेक महत्वाचे फायदे प्रदान करते.

BSNL चा 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. यात रोज फ्री डेटा, फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखे फायदे मिळतात. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात 300 दिवसांची वैधता मिळते, म्हणजेच तुम्हाला 300 दिवसांसाठी वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. मात्र इथे तुम्हाला एका खास गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. BSNL च्या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे केवळ 60 दिवसांसाठी वैध आहेत.

म्हणजेच रिचार्ज केल्यानंतर पहिल्या 60 दिवसांसाठीच तुम्हाला रोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली फ्री 100 एसएमएसचे फायदे मिळतील. मात्र, आम्ही म्हटल्याप्रमाणे 60 दिवस संपल्यानंतरही तुमची वैधता 300 दिवसांसाठी वैध असेल. 60 दिवसांनंतर केलेल्या कॉल आणि एसएमएससाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. युजर्स 300 दिवस इंटरनेट वापरू शकतात, पण 60 दिवस संपल्यानंतर स्पीड 40 केबीपीएसपर्यंत कमी होतो.

तुम्ही या प्लॅनवर खूश नसाल आणि काही अतिरिक्त बेनिफिट्सच्या शोधात असाल तर BSNL 1,198 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते. यात दर महिन्याला 3 GB डेटा मिळतो. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दरमहा 300 मिनिटे आणि 30 फ्री एसएमएस मिळतात.

आम्ही तुम्हाला BSNL च्या या स्वस्त प्लॅनची माहिती दिली आहे. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार या प्लॅनची खरेदी करू शकतात. कारण, अंतिम निर्णय तुमचा असेल.

हेही वाचा :

2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान

निक शिंदे आणि अनुश्री मानेची जोडी असलेले रोमॅंटिक गाणं ‘पदर’ रिलीज

मोठी बातमी! आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, कारण…