कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध

कोल्हापूर उत्तर विधानसभा(political news) मतदारसंघांमधून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरू होतं. मात्र, अखेर काँग्रेसने ही जागा आपल्याकडे कायम राखताना विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा पत्ता कट करत माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना संधी दिली आहे.

मात्र, राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला उमेदवारी(political news) जाहीर झाल्यापासूनच कडाडून विरोध झाला आहे. पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता माजी नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारी विरोधात बंड पुकारला आहे. तब्बल 26 नगरसेवकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांना पत्र लिहीत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे.
पत्रामध्ये म्हटलं आहे की उमेदवार जाहीर झाल्यापासून आमच्या सर्वांचा मतदारसंघातून या उमेदवारीवरून संभ्रम आणि प्रचंड नाराजीचा सूर आहे. मतदारसंघातील नागरिकांना हा लादलेला उमेदवार आहे असा ठाम विश्वास बसला आहे. तरी आम्हा सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की आपण वरिष्ठ नेते मंडळी सोबत चर्चा करून हा उमेदवार तातडीने बदलावा.
या पत्रावर निलोफर आजगेकर, शारगंधर देशमुख, अर्जुन माने, प्रतीक्षा धीरज पाटील, जय पटकारे, संदीप नेजदार, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे, उमा शिवानंद बनछोडे, वहिदा फिरोज सौदागर, मधुकर रामाणे, छाया उमेश पवार, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, संदीप सरनाईक, शेखर जाधव, दीपा मगदूम, मेहजबी सुभेदार, अफजल पिरजादे, भुपाल शेटे, नियाज खान, राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे, जयश्री चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, राजेश लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याचे पडसाद थेट कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर उमटले. शनिवारी रात्री अज्ञातांनी काँग्रेस कार्यालयाच्या दरवाजावर दगडफेक केली. इतकेच नव्हे, तर काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवर काळ फासून ‘चव्हाण पॅटर्न’ उल्लेख केल्याने भूवया उंचावल्या.
त्यामुळे हा प्रकार लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून झाला की राजकीय कुरघोडीचा प्रकार होता अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, दगडफेक झाल्याच्या समोर आल्यानंतर लगेच काँग्रेस कार्यालय परिसरातील लाईट बंद करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार कोणी केला याची सुद्धा चर्चा रगंली आहे.
हेही वाचा :
“मी माझ्या शेवटच्या काही वर्षात…” IPL पूर्वी महेंद्रसिंग धोनीचं विधान
विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘या’ बड्या पक्षाने दिला स्वबळावर लढण्याचा इशारा
मेरो करण-अर्जुन आयेंगे… सलमान-शाहरुखचा आयकॉनिक चित्रपट 29 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर