‘लाडक्या भावांसाठी मटक्याचे दुकान’ ठाकरे गटाकडून VIDEO शेअर शिंदेचा ‘स्टंटबाज आमदार’ लक्ष्य

सरकार “लाडकी बहीण – लाडकी बहीण” म्हणुन ऊर बडवून घेते तर दुसरीकडे सत्ताधारी लोक आपल्याच कार्यकर्त्यांना मटक्याचे दुकान उघडून देतात, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना(political) पक्षाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोणी केलेयत हे आरोप? काय आहे या व्हिडीओत?

उद्धव ठाकरे(political) यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पौळ यांच्याकडून नाव न घेता आमदार बांगर यांना लक्ष्य करण्यात आले आहे. चिखली भवरा आणि जुगार खेळतांनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करीत त्यांनी हे आरोप केले आहेत. याप्रकरणी आज हिंगोलीचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन करणार कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे गटाच्या सोशल मिडियाप्रमुख आयोध्या पौळ यांनी काही लोक जुगार खेळतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करून शिंदे गटाचे हिंगोलीच्या कळमनुरी येथील आमदार संतोष बांगर यांना लक्ष केलंय. हिंगोलीच्या खटकाळी बायपासवरील शिवराज बार येथील सदर व्हिडीओ असल्याचा आरोप आयोध्या पौळ यांनी केलाय. संतोष बांगर यांच नाव न घेता स्टंटबाज आमदार असा उल्लेख त्यांनी या व्हिडीओमध्ये केलाय. यासोबतच शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांचा भाऊ खुर्चीवर बसलेला असल्याचं ही त्या या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.
एकीकडे सरकार म्हणत आमची लाडकी बहीण पण सरकारचे काही आमदार लाडक्या बहिणींचे संसार उद्धस्त करत आहेत. दारु, जुगार खेळून लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला वाम मार्गाला लावत आहे. एका स्टंटबाज आमदारांचा भाऊ यात आहे. गांजा, वाळूचे अवैध धंदे या आमदाराच्या कृपाशिर्वादाने चालतात.
सरकार "लाडकी बहीण – लाडकी बहीण" म्हणुन ऊर बडवून घेते तर दुसरीकडे सत्ताधारी लोक आपल्याच कार्यकर्त्यांना मटक्याचे दुकान उघडून देते….#मटकाकिंग #मराठवाडा @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @mieknathshinde @Dev_Fadnavis… pic.twitter.com/VyxsG6F4Zt
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) September 18, 2024
स्टंटबाज आमदार दुसऱ्या जिल्ह्यातील आरटीओला धमकी देतो. पण स्वत:च्या जिल्ह्यात अवैध ट्रकमुळे वाहतूक कोंडी होते. यावर कधी बोलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येणाऱ्या काळात मी असे अनेक व्हिडीओ पोस्ट करुन भांडाफोड करणार असल्याचे अयोध्या पौळ यांनी सांगितले.
हेही वाचा:
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या तरूणीने आईला संपवले
ना इंटरनेट, ना कॉलिंग..Jio चं नेटवर्क गायब; नेमकं काय झालं?