सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण ‘पायथन’ टीमला दाखवला बाहेरचा रस्ता
गुगलने गेल्या काही आठवड्यांत अनेक कर्मचाऱ्यांना(python) कामावरून काढून टाकले आहे. युनायटेड स्टेटबाहेरील कमी पगारात काम करणारे कर्मचारी नियुक्त केले आहेत. खर्च कमी करण्याच्या गुगलच्या योजनेमुळे संपूर्ण टीमला कामावरून कमी करण्यात आले आहे.
याचा परिणाम कंपनीतील पायथन(python) विभागातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. कंपनीने म्युनिक, जर्मनी येथे एक नवीन टीम स्थापन करण्याची योजना आखली आहे जी कमी पगारात काम करेल. त्यामुळे ही कर्मचारी कपात केली असण्याची शक्यता आहे असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
फ्री प्रेस जर्नल अहवालानुसार, Mastodon वरील Social.coop पोस्टवर Google Python टीमच्या एका माजी कर्मचाऱ्याने त्याचे मत व्यक्त केले आहे. कर्मचाऱ्याने सांगितले की Google मधील त्यांची दोन दशकांची कारकीर्द ही आता संपली आहे. कंपनीने कर्मचारी कपात करणे चुकीचे आहे. दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, व्यवस्थापकासह त्याच्या संपूर्ण टीमला कामावरून काढून टाकले गेले आणि त्यांच्या जागी परदेशातील कर्मचाऱ्यांना कामावर घेतले.
यूएस पायथन टीममध्ये दहा पेक्षा कमी सदस्य होते. गुगलने रिअल इस्टेट आणि फायनान्स विभागातील कर्मचारी कमी केल्याचा अहवाल आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
गुगलच्या वित्त प्रमुख रुथ पोराट यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलमध्ये सांगितले आहे की कंपनी बंगळुरू, मेक्सिको सिटी आणि डब्लिनवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीच्या पुर्नरचनेचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली आहे.अमेरिकेसह जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मोठ्या कंपन्यांसोबतच स्टार्टअप्सनीही आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या त्यांचा खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नोकऱ्या कमी करत आहेत. याच कारणामुळे गुगलशिवाय ॲमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
हेही वाचा :
शांतिगिरी महाराजांनी भरला शिवसेना शिंदे गटाचा अर्ज
पाकिस्तानने केली मोठी घोषणा; BCCI उचलणार मोठं पाऊल?
आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क ‘सेक्स डॉल’..